सरसकट हेक्टरी १७,००० रुपये वाटप सुरू; तुम्हाला पैसे आले का? स्टेटस चेक करा Crop Insurance 2025

Crop Insurance 2025: राज्य सरकारने जाहीर केलेल्या ₹३१,६२८ कोटींच्या अतिवृष्टी विशेष पॅकेज अंतर्गत पीक विमाधारक शेतकऱ्यांसाठी ₹१७,००० प्रति हेक्टरी मदतीचे वितरण सुरू झाले आहे. अनेक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होत असून, आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमचे पेमेंट स्टेटस अपडेट झाले आहे की नाही, हे अगदी सहज तपासू शकता.

तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही किंवा तुमची रक्कम मंजूर झाली आहे की नाही, हे तपासण्याची संपूर्ण आणि सोपी प्रक्रिया खालीलप्रमाणे दिली आहे.

लडकी बहीण योजना 3000 वाटप सुरू; यादी जाहीर तुमचे नाव पहा
लडकी बहीण योजना 3000 वाटप सुरू; यादी जाहीर तुमचे नाव पहा

PMFBY वेबसाइटवर पीक विम्याचे स्टेटस तपासण्याची सोपी प्रक्रिया

तुमच्या पीक विम्याचे स्टेटस तपासण्यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY) च्या अधिकृत वेबसाइटचा वापर करावा लागतो. ही प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

पायरी १: वेबसाइट ओपन करा

  1. मोबाईलमध्ये Google Chrome ब्राउझर ओपन करा.
  2. सर्च बारमध्ये ‘PMFBY’ असे टाईप करून सर्च करा.
  3. सर्वात पहिली लिंक, ‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना’ (Official Website) ओपन करा.

पायरी २: फार्मर कॉर्नरमध्ये लॉगिन करा

  1. वेबसाइट ओपन झाल्यावर, खाली स्क्रोल करा आणि ‘फार्मर कॉर्नर’ (Farmer Corner) या पर्यायावर क्लिक करा.
  2. त्यानंतर ‘Login for Farmer’ या हिरव्या बटनावर क्लिक करा.
  3. येथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि दिसणारा कॅप्चा कोड (Captcha Code) अचूक भरा.
  4. सर्व माहिती भरल्यावर ‘Request OTP’ या बटनावर क्लिक करा.

टीप: जर तुम्ही एकापेक्षा जास्त पीक विम्याचे फॉर्म एकाच मोबाईल नंबरवरून भरले असतील, तर तुम्हाला आधार क्रमांक एंटर करण्यास सांगितले जाईल.

लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी (e-KYC) ची चिंता अखेर संपली! नवीन शासन निर्णय आला Ladki Bahin Yojana KYC Update
लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी (e-KYC) ची चिंता अखेर संपली! नवीन शासन निर्णय आला Ladki Bahin Yojana KYC Update

पायरी ३: शेतकऱ्याची माहिती (Details) तपासा

  1. तुमच्या मोबाईलवर आलेला OTP (वन टाइम पासवर्ड) एंटर करा आणि ‘Submit’ बटनावर क्लिक करा.
  2. तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्याची संपूर्ण माहिती (फार्मर डिटेल्स) ओपन होईल. यामध्ये तुमचे नाव आणि मोबाईल नंबर दिसेल.

पायरी ४: पेमेंट स्टेटस तपासा (वर्ष आणि हंगाम निवडा)

  1. स्क्रीनवर खाली स्क्रोल करून ‘पॉलिसी डिटेल्स’ या विभागात या.
  2. येथे ‘ईयर’ (Year) मध्ये तुम्हाला ज्या वर्षाचा पीक विमा तपासायचा आहे ते वर्ष (उदा. २०२५) निवडा.
  3. ‘सीजन’ (Season) मध्ये ‘खरीप’ (Kharif) किंवा ‘रब्बी’ (Rabi) निवड करा.

पायरी ५: क्लेम आणि रक्कम तपासा

  1. पेमेंट स्टेटस तपासण्यासाठी, तुम्हाला ‘Total Claim Paid’ (एकूण भरलेला क्लेम) हा पर्याय दिसेल.
  2. या पर्यायासमोर जर ‘झिरो’ (Zero) अमाऊंट दिसत असेल, तर तुमच्या क्लेमला मंजूरी मिळाली नाही किंवा पैसे जमा झाले नाहीत असे समजावे.
  3. जर झिरोच्या जागी काही रक्कम दिसत असेल, तर ती रक्कम तुमच्या खात्यात मंजूर झाली आहे.
  4. ही मंजूर रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी, ‘Total Claim Paid’ या लाल बटनावर क्लिक करा.

पायरी ६: अंतिम पेमेंट स्थिती

  • स्क्रीनवर दिसणारे तपशील: या विभागात तुम्हाला शेतकऱ्याचे नाव, ॲप्लिकेशन नंबर, क्लेम टाईप, लॉस परसेंटेज आणि ‘Total Claim Amount’ (एकूण क्लेम रक्कम) दिसेल.
  • जर या ठिकाणी Amount (रक्कम) दिसत असेल, तर तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे. ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाली आहे की नाही, हे तुम्ही तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये तपासावे.

Leave a Comment