राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच सरसकट ₹ 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे.
Crop Insurance Payment
मुख्यमंत्री कार्यालयाकडून तातडीची सूचना जारी करण्यात आली असून, या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील 5 आवश्यक कागदपत्रे तात्काळ तयार ठेवावी लागणार आहेत. ज्यांच्याकडे ही कागदपत्रे नसतील, त्यांना लाभ मिळणार नाही.
कर्जमाफीची सद्यस्थिती आणि महत्त्वाचे निर्णय
- सरसकट कर्जमाफीची शक्यता: प्राथमिक माहितीनुसार, शेतकऱ्यांचे ₹ 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ केले जाण्याची शक्यता आहे.
- प्रक्रिया सुरू: कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी अर्थ मंत्रालयासह एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.
- निधीची तरतूद: सरकारने 15 बँकांसाठी ₹ 34,000 कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शवली आहे, ज्यामुळे या बँकांमधील कर्ज माफ केले जाईल.
- कर्जमाफीचा कालावधी: 2017 ते 2025 पर्यंत शेती पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू शकतो.
- लक्ष्य: कर्जमाफीचा लाभ प्रामुख्याने ‘गरीब शेतकऱ्यांना’ म्हणजेच कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
कर्जमाफीसाठी ‘ही’ 5 कागदपत्रे अत्यंत आवश्यक
मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार, कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील दोन दिवसांत खालील पाच कागदपत्रे तातडीने तयार ठेवणे आवश्यक आहे. यातील दोन जुनी आणि तीन कागदपत्रे नवीन आहेत:
जुनी कागदपत्रे (दुरुस्तीसह):
- आधार कार्ड (Aadhaar Card):
- आधार कार्डवरील नाव (जन्म प्रमाणपत्राप्रमाणे) आणि जन्म तारीख अचूक व पूर्ण असल्याची खात्री करा. यामध्ये चूक असल्यास कर्जमाफीत अडचण येऊ शकते.
- पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड (Ration Card):
- सरकार गरीब शेतकऱ्यांना (ज्यांचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे) कर्जमाफीचा लाभ देणार असल्याने, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे. पांढरे रेशन कार्डधारकांना लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे.
नवीन (तात्काळ तयार करायची) कागदपत्रे:
- उत्पन्नाचा दाखला (Income Certificate):
- तुमचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तपासण्यासाठी हा दाखला आवश्यक आहे. जास्त उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे हा दाखला त्वरित तयार करून घ्या.
- रहिवासी दाखला (Domicile Certificate):
- तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी शेतकरी आहात हे सिद्ध करण्यासाठी हा पुरावा आवश्यक आहे. बनावट किंवा बाहेरील राज्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेऊ नये यासाठी सरकारने ही अट ठेवली आहे.
- सातबारा उतारा (7/12 Extract):
- हा उतारा जमिनीच्या मालकीचा पुरावा म्हणून आवश्यक आहे. तुमची एकूण जमीन किती आहे, हे तपासले जाईल. जास्त जमीन (उदा. 15-20 एकर) असलेल्या शेतकऱ्यांना गरीब शेतकरी मानले जाणार नाही, त्यामुळे कर्जमाफीच्या लाभातून वगळले जाण्याची शक्यता आहे.
कर्जमाफी होणाऱ्या प्रमुख 15 बँका (उदाहरणार्थ)
येत्या दोन दिवसांत सरकारने निधी देण्याची तयारी दर्शवलेल्या काही बँका (ज्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे) खालीलप्रमाणे आहेत:
- पोस्ट ऑफिस बँक
- जिल्हा मध्यवर्ती बँक (DCCB)
- जिल्हा सहकारी बँक
- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
- बँक ऑफ इंडिया (BOI)
- बँक ऑफ महाराष्ट्र
- बँक ऑफ बडोदा
- एचडीएफसी बँक
- आयसीआयसीआय बँक
- कोटक महिंद्रा बँक
- इतर संस्थात्मक बँका
महत्त्वाची सूचना: बँकांकडून कर्ज भरण्यासाठी फोन येत असल्यास, तुम्ही स्पष्टपणे सांगावे की सरकार कर्जमाफीची घोषणा करणार असल्याने आम्ही कर्ज भरणार नाही. कर्जमाफीच्या तोंडावर बँकांकडून असे फोन येणे अपेक्षित आहे. चुकूनही कर्ज भरू नका.
दोन लाखांवरील कर्ज माफ करण्यासाठी सोपी आयडिया
तुमचे शेती पिकासाठी घेतलेले कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला ते संपूर्ण माफ करून घ्यायचे असेल, तर तुम्ही समितीकडे किंवा संबंधित सरकारी कार्यालयात आपले कर्ज जास्त का आहे आणि आपण गरीब शेतकरी कसे आहात, याचा सविस्तर अर्ज किंवा निवेदन सादर करू शकता. जास्त कर्जमाफीसाठी आवश्यक असणारी ही कागदपत्रे उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड आणि रहिवासी दाखला तुमची आर्थिक स्थिती स्पष्ट करण्यास मदत करतील.