Ladki Bahin Yojana KYC New Process : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी आता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तुमचा मासिक हप्ता न चुकता मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नवीन आणि सोप्या पद्धतीने तुमची ई-केवायसी त्वरित पूर्ण करा.
ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक आणि पती/वडिलांचा आधार क्रमांक आवश्यक असेल.
ई-केवायसी (e-KYC) करण्याची संपूर्ण सोपी प्रक्रिया (Step-by-Step)
पायरी १: पोर्टलवर लॉगिन आणि आधार प्रमाणीकरण
- वेबसाईट: Google मध्ये “लाडकी बहिण महाराष्ट्र gov dot in” असे सर्च करून योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा.
- e-KYC लिंक: मुखपृष्ठावर, “लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा” या पर्यायावर टच करा.
- आधार क्रमांक: लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक व्यवस्थित भरा.
- ओटीपी पाठवा: कॅप्चा कोड भरून, ‘मी सहमत आहे’ यावर टिक करा आणि नंतर ‘OTP पाठवा’ बटनावर क्लिक करा.
- OTP सबमिट करा: आधार लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला सहा अंकी OTP एंटर करून ‘Submit’ बटनावर टच करा.
पायरी २: कुटुंबाच्या आधार क्रमांकाची पडताळणी
- दुसरा आधार क्रमांक: पुढील पेजवर, लाभार्थी महिला विवाहित असल्यास पतीचा आधार क्रमांक आणि अविवाहित असल्यास वडिलांचा आधार क्रमांक टाका.
- ओटीपी पाठवा: कॅप्चा टाकून, ‘मी सहमत आहे’ वर टिक करा आणि ‘OTP पाठवा’ बटनावर क्लिक करा.
- OTP एंटर करा: ज्या व्यक्तीचा आधार क्रमांक टाकला आहे, त्यांच्या मोबाईलवर आलेला सहा अंकी OTP एंटर करा आणि ‘सबमिट करा’ बटनावर टच करा.
पायरी ३: जात प्रवर्ग निवड आणि महत्त्वाचे घोषणापत्र
- जात प्रवर्ग (Cast Category): आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग (Cast) दिलेल्या यादीतून योग्यरित्या निवडायचा आहे.
- महत्वाचे घोषणापत्र (Declaration): खालील दोन अत्यंत महत्त्वाचे पर्याय वाचून त्यांना ‘होय’ निवडायचे आहे (येथे अनेकजण चूक करतात, ‘नाहीत’ असा शब्द पर्यायात असल्याने त्याचे उत्तर ‘होय’ निवडावे लागते).
- सरकारी नोकरी: “माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यात नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत.” (निवड: होय)
- लाभार्थी संख्या: “माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.” (निवड: होय)
- अंतिम संमती: खालील टर्म्स आणि कंडिशन वाचून त्यावर टिक मार्क करा.
पायरी ४: प्रक्रिया पूर्ण करा
- सर्व माहिती भरून झाल्यावर ‘Submit’ बटनावर क्लिक करा.
- तुम्हाला “e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे” (e-KYC Successful) असा मेसेज स्क्रीनवर दिसेल.
ही संपूर्ण प्रक्रिया तांत्रिक अडचणींशिवाय अवघ्या २ ते ५ मिनिटांत पूर्ण होते. तुमचा हप्ता नियमितपणे मिळवण्यासाठी त्वरित ई-केवायसी पूर्ण करून घ्या.