Ladki Bahin Yojana KYC Process : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी आता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक दिवसांच्या तांत्रिक अडचणींनंतर, आता योजनेचे पोर्टल व्यवस्थित सुरू झाले आहे आणि लाभार्थी महिला अवघ्या काही मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
Ladki Bahin Yojana KYC Process
तुमचा मासिक हप्ता न चुकता मिळवण्यासाठी, खाली दिलेल्या नवीन आणि सोप्या पद्धतीने तुमची ई-केवायसी त्वरित पूर्ण करा.
ई-केवायसी (e-KYC) करण्याची संपूर्ण सोपी प्रक्रिया (Step-by-Step)
ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचा आणि तुमच्या पती/वडिलांचा आधार क्रमांक आवश्यक असेल.
पायरी १: पोर्टलवर लॉगिन आणि आधार प्रमाणीकरण
- वेबसाईट: Google मध्ये “लाडकी बहिण महाराष्ट्र gov dot in” असे सर्च करून योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा.
- e-KYC लिंक: मुखपृष्ठावर, “लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा” या पर्यायावर टच करा.
- आधार क्रमांक: लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक व्यवस्थित भरा.
- कॅप्चा भरा: खालील कॅप्चा कोड समोरील रकान्यात जशास तसा टाका.
- OTP पाठवा: ‘मी सहमत आहे’ यावर टच करा आणि नंतर ‘OTP पाठवा’ बटनावर क्लिक करा.
- OTP सबमिट करा: आधार लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला सहा अंकी OTP एंटर करून ‘Submit’ बटनावर टच करा.
पायरी २: कुटुंबाचा तपशील आणि OTP द्वारे पडताळणी
- दुसरा आधार क्रमांक: पुढील पेजवर, लाभार्थी महिला विवाहित असल्यास पतीचा आधार क्रमांक आणि अविवाहित असल्यास वडिलांचा आधार क्रमांक टाका.
- कॅप्चा आणि संमती: खालील कॅप्चा टाकून ‘मी सहमत आहे’ वर टच करा.
- ओटीपी पाठवा: ‘OTP पाठवा’ बटनावर क्लिक करा. ज्या व्यक्तीचा आधार क्रमांक टाकला आहे, त्यांच्या मोबाईलवर आलेला सहा अंकी OTP एंटर करा.
- सबमिट: ‘सबमिट करा’ बटनावर टच करा.
पायरी ३: जात प्रवर्ग आणि महत्त्वाचे घोषणापत्र (Declaration)
- जात प्रवर्ग (Cast Category): आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग (Cost) निवडायचा आहे. इथे दिलेल्या यादीतून तुमची योग्य जात सिलेक्ट करा.
- महत्वाचे घोषणापत्र: खालील दोन अत्यंत महत्त्वाचे पर्याय वाचून त्यांना ‘होय’ निवडायचे आहे. (येथे अनेकजण चूक करतात, ‘नाहीत’ असा शब्द पर्यायात असल्याने त्याचे उत्तर ‘होय’ निवडावे लागते.)
- सरकारी नोकरी: “माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यात नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत.” (निवड: होय)
- लाभार्थी संख्या: “माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.” (निवड: होय)
- अंतिम संमती: खालील टर्म्स आणि कंडिशन वाचून त्यावर टिक मार्क करा.
पायरी ४: प्रक्रिया पूर्ण करा
- सर्व माहिती भरून झाल्यावर ‘Submit’ बटनावर क्लिक करा.
- तुम्हाला “e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे” (e-KYC Successful) असा मेसेज स्क्रीनवर दिसेल.
वेळेची नोंद: ही संपूर्ण प्रक्रिया तांत्रिक अडचणींशिवाय अवघ्या २ ते ५ मिनिटांत पूर्ण होते. तुमचा हप्ता नियमितपणे मिळवण्यासाठी त्वरित ई-केवायसी पूर्ण करून घ्या.