Sanjay Gandhi Niradhar Yojana Documents: संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे. महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांना मिळणारे अनुदान ऑक्टोबर महिन्यापासून ₹ १५०० वरून ₹ २५०० वाढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सध्या अनेक दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात जुनी रक्कम (₹ १५००) जमा झाली आहे. राहिलेले ₹ १००० जमा होतील का किंवा पूर्ण ₹ २५०० नियमितपणे मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे तातडीने जमा करावी लागतील, तसेच DBT पोर्टलवर कोणती प्रक्रिया आवश्यक आहे, याबद्दलची सविस्तर माहिती या पोस्टद्वारे पाहणार आहोत.
संजय गांधी निराधार योजना: पेन्शन वाढ आणि सद्यस्थिती
- अनुदान वाढ: सरकारने संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांगांसाठी अर्थसहाय्यात ₹ १००० ची वाढ केली आहे, ज्यामुळे रक्कम ₹ २५०० झाली आहे.
- संपूर्ण रक्कम जमा: मुंबई मंत्रालयातील संबंधित अधिकारी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांची ऑनलाईन नोंदणी तालुका तहसील कार्यालय मार्फत DBT पोर्टलवर ‘दिव्यांग’ म्हणून योग्य आणि पूर्ण करण्यात आली आहे, त्यांना कालपासूनच ₹ २५०० पेन्शन जमा झाले आहेत.
- मागणी: बच्चू कडू यांची दिव्यांगांसाठी ₹ ६००० वाढीव अनुदानाची मागणी कायम आहे. सोबतच, विधवा आणि अनाथांच्या मानधनातही वाढ करण्याची त्यांची मागणी आहे.
₹ १५०० जमा होण्याचे कारण आणि पुढील उपाय
काही लाभार्थ्यांच्या खात्यात अपूर्ण रक्कम जमा होण्यामागे डीबीटी (DBT) पोर्टलवर नोंदीतील त्रुटी आहेत.
- कमी रक्कम जमा होण्याचे कारण:
- दिव्यांग योजना अंतर्गत ऑनलाईन एन्ट्री डीबीटी पोर्टलवर पूर्ण किंवा अपडेट झालेली नाही.
- अर्धवट नोंद झाल्यामुळे किंवा जुन्या पेन्शन योजनेचे नाव असल्यामुळे सध्या ₹ १५०० जमा झाले आहेत.
- पुढील लाभ:
- अर्धवट नोंद झाल्यामुळे सध्या दीड हजार रुपये जमा झाले असून, पुढील महिन्यापासून अडीच हजार रुपये पूर्ण रक्कम मिळेल.
- टीप: दिव्यांग नोंद असून पण दीड हजार आले असतील, तर त्यांना पुढील काही दिवसांत वाढवून एक हजार रुपये येतील. कृपया कोणतेही अफवांवर विश्वास ठेवू नका.
- तात्काळ प्रक्रिया: पुढील महिन्यापासून पूर्ण ₹ २५०० रक्कम मिळवण्यासाठी सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्या तालुक्यात तहसील कार्यालयात जाऊन दिव्यांग योजना अंतर्गत डीबीटी पोर्टलवर आपली नोंद तपासावी व संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी.
दिव्यांग पेन्शन योजना: आवश्यक कागदपत्रे (Divyang Pension Yojana Documents)
डीबीटी पोर्टलवर नोंद अपडेट करण्यासाठी आणि पेन्शनसाठी खालील कागदपत्रे तातडीने जमा करण्यास सांगण्यात आले आहे:
- आधार कार्ड: (याचे ओरिजनल झेरॉक्स घेऊन जाणे. झेरॉक्सवर मोबाईल नंबर लिहिणे आवश्यक आहे.)
- पॅन कार्ड
- दिव्यांग दाखला
- युडीआयडी कार्ड (UDID)
- बँक पासबुक
UDID KYC आणि तहसील कार्यालयात करण्याची प्रक्रिया
- केवायसी (KYC) बंधनकारक: दिव्यांग प्रमाणपत्राची (UDID) केवायसी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जे UDID कार्डाची केवायसी करणार नाहीत, त्यांना शासकीय योजनेत नक्कीच अडचणी येणार आहेत.
- कार्यालयात भेट: सर्व कागदपत्रे घेऊन तहसील कार्यालयात संजय गांधी विभागाला भेट द्या.
- नोंद करून घ्या: त्यांना ‘आम्ही दिव्यांग आहोत, दिव्यांग योजनेतून डीबीटी पोर्टलवर नोंद करून द्या’ अशी विनंती करा, ज्यामुळे तुम्हाला पुढील सर्व योजनेचे पैसे (₹ २५००) तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.