महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra Board) फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. (SSC HSC Exam Timetable)
बारावी (HSC) परीक्षा २०२६ चे वेळापत्रक
| घटक | सुरुवात तारीख | समाप्ती तारीख |
| लेखी परीक्षा | मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ | बुधवार, १८ मार्च २०२६ |
| प्रायोगिक, तोंडी, श्रेणी, अंतर्गत मूल्यांकन परीक्षा | शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ | ९ फेब्रुवारी २०२६ |
महत्त्वाची सूचना: विज्ञान शाखेच्या प्रायोगिक परीक्षा, वाणिज्य शाखेतील प्रोजेक्ट मूल्यांकन आणि कला शाखेतील तोंडी परीक्षा याच कालावधीत पूर्ण होतील.
दहावी (SSC) परीक्षा २०२६ चे वेळापत्रक
| घटक | सुरुवात तारीख | समाप्ती तारीख |
| लेखी परीक्षा | शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ | बुधवार, १८ मार्च २०२६ |
| प्रायोगिक, तोंडी, श्रेणी, अंतर्गत मूल्यांकन परीक्षा | २ फेब्रुवारी २०२६ | १८ फेब्रुवारी २०२६ |
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
- शारीरिक शिक्षण/कला विषय: शारीरिक शिक्षण, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र आणि कला यांसारख्या विषयांच्या मूल्यांकन परीक्षा शाळा स्तरावर मंडळाने दिलेल्या कालावधीत पूर्ण केल्या जातील.
- नोंदणी अर्ज (Form No. 17) सादर करण्याची मुदत:
- पात्र विद्यार्थ्यांनी १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत अर्ज क्रमांक १७ ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.
- या मुदतीनंतर प्रति विद्यार्थी प्रति दिवस ₹ २० अतिविलंब शुल्क आकारले जाईल.
- अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत कोणत्याही परिस्थितीत वाढवली जाणार नाही.
- अधिकृत संकेतस्थळ: वेळापत्रक आणि नोंदणी संबंधी सविस्तर सूचना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in वर उपलब्ध आहेत.
सर्व विद्यार्थ्यांनी वेळेचे अचूक नियोजन करून परीक्षेची तयारी सुरू करावी, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.